Maharashtra MBA Admission Process 2014 Cast Validity Problem
First Year MBA/MMS Admissions 2014-2015
एमबीएची सीईटी उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील सुमारे ४९ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश तंत्रशिक्षण संचालनालयाच्या जाचक अटीमुळे टांगणीला लागले आहेत. व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट) अनिवार्य केले आहे. मात्र, ते सादर करण्यासाठी अवघी दहा दिवसांची मुदत दिली आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो आणि हे प्रमाणपत्र काही कारण दिल्याशिवाय दिले जात नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत.एमबीएच्या ४५ हजार जागा रिक्त आहेत. गेल्या वर्षी या जागा पुरेशा भरल्या न गेल्याने फक्त महाराष्ट्रासाठी सीईटी घेण्यात आली. यात ४९ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करण्यासाठी प्रोफॉर्मा एच भरून घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदत मिळाली होती. यंदा फक्त दहा दिवसांची मुदत मिळाली आहे.
जात प्रमाणपत्र मिळणे अशक्यच
- व्हेरिफिकेशनसाठी जात प्रमाणपत्र सादर करण्यास डीटीईने दहा दिवसांची मुदत दिली आहे. प्रत्यक्षात जातप्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून प्रमाणपत्र मिळण्याची अधिकृत मुदतच सहा महिने आहे.
- विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र हवे असेल तर संबंधित कॉलेजचे कव्हरिंग लेटर जोडणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचा प्रवेशच अद्याप निश्चित न झाल्याने कॉलेजचे कव्हरिंग लेटर मिळणेच अशक्य.
पुढे काय?
- सर्व विद्यार्थ्यांना खुल्या गटातूनच व्हेरिफिकेशन अर्ज भरावे लागतील. सरकारने मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत मिळू शकेल. जे विद्यार्थी खुल्या गटातून प्रवेश घेऊ शकणार नाहीत ते मात्र एमबीएच्या प्रवेशापासून वंचित राहतील.
राज्य सरकारने गेल्या वर्षी मुदतवाढ दिली होती. यंदाही आम्ही प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने आम्ही मुदतवाढ देऊ शकत नाही. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी खुल्या गटातूनच अर्ज भरावेत. जे प्रवेश घेऊ शकत नाहीत त्याला मी काहीही करू शकत नाही. कारण मुदतवाढीचा अधिकार सरकारला आहे.
No comments: