AROGYA VIBHAG GROUP-D BHARTI 2016 | FIELD WORKER BHARTI 2016 | POLICE BHARTI 2016 | MAHADISCOM BHARTI 2016
Search Jobs & Results :


mahast.in - Maharashtra ST Mahamandal Driver Recruitment 2015

mahast.in - Maharashtra ST Mahamandal Driver Recruitment 2015 How To Apply Online Application Form

Maharashtra ST Mahamandal Driver Recruitment 2015

महत्वाच्या सूचना For Maharashtra ST Mandal Driver Bharti 2015. 
  1. i) उमेदवारांना लेखी परिक्षेची तारीखवेळ व ठिकाण एत्यादीबाबतची माहिती SMS व इ-मेल द्वारे कळविण्यात येईल.  
ii) परिक्षा प्रक्रियेच्या वेळेस उमेदवारास शारिरीक दुखापत झाल्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस रा.प. महामंडळ जबाबदार राहणार नाही.
  1. लेखी परिक्षेतील गुणानुक्रमे व आरक्षण विचारात घेऊन पात्र झालेल्या उमेदवारांची नावे महामंडळाच्या www.mahast.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येतील.
  2. संबंधित पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा ही उमेदवारांची कोणतीही कागदपत्रे व शारिरीक पात्रता यांची पुर्वतपासणी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परिक्षेत मिळालेल्या केवळ गुणांच्या आधारे उमेदवारांला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्राच्या पूर्ण छाननीनंतर उमेदवार वाहन-चालन चाचणी साठी पात्र ठरत असल्यासच गुणवत्तेच्या आधारे सामाजिक समांतर आरक्षण निहाय अंतिम निवड केली जाईल.
  3. उमेदवार अर्ज केलेल्या पदासाठीची विहित अर्हता, अटी व शर्ती पूर्ण करीत नसल्याचे आढळून आल्यास त्याचा/तिचा अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल.
  4. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात नांव नोंदणी केली असली तरी वरील पदासाठी विहित नमुन्यात स्वतंत्रपणे रितसर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  5. शासकीय, निमशासकीय, शासकीय उपक्रम तसेच रा.प. महामंडळाच्या सेवेतील कर्मचा-याने वर नमूद केलेल्या पदांकरिता अर्ज केला असेल, तर सदर कर्मचा-याला खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) अंतिम निवडपूर्व कागदपत्र तपासणीवेळी सादर करणे आवश्यक राहील. रा.प. महामंडळातील कर्मचा-याची निवड व नेमणूक झाल्यास त्याचे रा.प.नियमानुसार वेतन संरक्षित करण्यात येईल.
  6. पदासाठी असणारी किमान अर्हता आणि पात्रता धारण करणा-य़ा व लेखी परिक्षेस पात्र ठरणा-य़ा उमेदवारांना या पदांसाठी घेण्य़ात येणा-या परिक्षेची रुपरेषा, वेळापत्रक,परिक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतीची माहिती www.mahast.in  या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
  7. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी/भरती प्रक्रिया शुल्क भरण्यापूर्वी तो संबंधित पदाची अर्हता पूर्ण करतो की नाही याची खात्री करावी. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज अपात्र ठरला तर उमेदवाराने भरलेली भरती प्रक्रिया शुल्काची रक्कम परत केली जाणार नाही.तसेच कोणत्याही कारणास्तव भरती प्रक्रिया शुल्क परत केले जाणार नाही. उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्याचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तीची व्यवस्था केल्याचे आढळल्यास किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती दिल्याचे तसेच प्रमाणपत्रे/ कागदपत्रे किंवा कोणती माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची/ तिची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
  8. उमेदवाराना लेखी परीक्षासाठी नियोजित स्थळी व वेळी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
  9. परिक्षेच्या वेळी परीक्षा कक्षामध्ये किंवा परिक्षा केंद्राच्या परिसरात भ्रमणध्वनी (Mobile) अथवा इतर संपर्काची साधने वापरण्यास मनाई आहे.
  10. शासन निर्णय शालेय व क्रिडा विभाग क्र. राक्रिधो-२००२/प्र.क्र.६८/क्रि.युसे-२, दि.३.४.२००५ मधील तरतूदीनु्सार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणवत्ताधारक खेळाडूंसाठी त्याची गुणवत्ता व पात्रता विचारात घेवून उच्च वयोमर्यादा ५ वर्षापर्यत शिथिलक्षम राहिल.
  11. विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड या प्रवर्गाकरिता विहित केलेले आरक्षण त्या-त्या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास आंतर परिवर्तनीय आहे
अ) इमाव, विमाप्र, विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड या मागासप्रवर्गातील उमेदवाराना सामा़जिक   आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्रधिका-याने दिलेले प्रमाणपत्र(नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट) अंतिम निवड पूर्व कागदपत्र तपासणीवेळी वैध असलेले सादर करणे आवश्यक आहे.
ब) इमाव, विमाप्र, विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड आणि खुल्या गटातील महिलाना ३० टक्के महिला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्रधिका-यानी दिलेले वैध प्रमानपत्र (नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट)अंतिम निवडपूर्व कागदपत्र तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
क) समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणांतर्गत काप्पीकृत असून ते त्या-त्या सामाजिक आरक्षणाच्या गटातून भरण्यात येते. समांतर आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे त्याच जाती प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांमधून भरण्यात येतील.
  1. मागासर्गीय प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक १२ डिसेंबर, २०११ नुसार आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर ६ महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे ही संबंधीत उमेदवाराची जबाबदारी राहील.
  2. लेखी परीक्षेतील गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना मुलाखतीच्यावेळी कागदपत्र तपासणी करतांना शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, अनुभव, समांतर आरक्षणासंबंधी, शासकीय सेवेतील उमेदवारासाठी नियुक्ती प्राधिका-याचे ना हरकत प्रमाणपत्र, लहान कुटूंब असल्याचे प्रतिज्ञापत्र तसेच मागासवर्ग जाती प्रमाणपत्र इत्यादी जे जे उमेदवारास लागू होते त्या दाखल्यांच्या मूळ साक्षांकित प्रती (Attested Copies) या केंद्र / राज्यशासनाचे राजपत्रित अधिकारी, पोस्टमास्तर, मुख्याध्यापक यांच्याकडून सांक्षाकित करुन अंतीम निवडपूर्व कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
  3. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांची संख्या बदलण्यासापेक्ष आहे. निवड झालेल्या उमेदवारांना रा.प. महामंडळाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार नेमणूका देण्यात येतील. भविष्यात जस-जशा जागा रिक्त होतील त्याप्रमाणे नेमणुका देण्यात येतील.
  4. सदर भरती प्रक्रिया पूर्णत: वा अंशत: रद्द करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे अधिकार रा.प. महामंडळ राखून ठेवत आहे.
अर्ज भरण्याच्या सूचना 

१. प्रस्तुत परिक्षेसाठी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकरण्यात येणार नाहीत.
२. उमेदवारानी वेब-बेस्ड (web-based) ऑनलाईन अर्ज www.mahast.in या संकेतस्थाळावर सादर करणे आवश्यक राहील. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल
३. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा/अपूर्ण तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणा-या सूचनासंदेश माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. तसेच, ई-मेल आयडी व मोबाईल संदेश वहनात येणा-या तांत्रिक अडचणींना रा.प. महामंडळ हे जबाबदार असणार नाही. सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील.
४. उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना, शैक्षणिक कागदपत्रे अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही. तसेच, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही.
५. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करतांना उमेदवाराजवळ स्वता:चा अद्ययावत विहित पासपोर्ट साईज फोटो व सही स्कँन करुन www.mahast.in  या संकेतस्थळावरील सूचनेनुसार अपलोड करणे अनिवार्य आहे. अपलोड करतांना फोटोची साईज केबी ते 100 केबी असने आवश्यक आहे व सहीची साईज केबी ते 50 केबी असने आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
६.  उमेदवारांची लेखी परिक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्वतपासणी/ छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरिम यादी प्रसिध्द करुन मूळ कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवारांची निवड निश्चित करण्यात येईल. सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र ठरल्यास त्यास प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणा-या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे अधिकार रा.प.महामंडळाने राखून ठेवण्यात आलेले आहेत व याबाबत उमेदवारास कोणतीही तक्रार करता येणार नाही.
७. अ )ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना  www.mahast.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवाराने www.mahast.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जातील संपुर्ण माहिती भरल्यानंतर उमेदवारास Application ID सह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत फी भरण्याचे चलन तीन प्रतींमध्ये (उमेदवाराची प्रतबँकेची प्रत आणि रा. प. महामंडळाची प्रत ) उपलब्ध होईल.
ब ) सदर चलनाची प्रिंट काढून त्या चलनामार्फतच उमेदवाराने चलनात नमूद असलेली फी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी भरणा करावी व सदर शाखेकडून चलनावर रक्कम जमा झालेबाबत Transaction ID नमुद केला जाईल. चलनाच्या तीन प्रतिपैकी उमेदवारास त्याची स्वतःची प्रत व  रा. प. महामंडळाची प्रत परत देण्यात येतील.

क) त्यानंतर सदर उमेदवारास भरती प्रक्रिया शुल्क जमा झाल्याबाबतचा SMS येईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये भरती प्रक्रिया शुल्क जमा केले म्हणजे लेखी परिक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपली असे नव्हे.

ड) भरती प्रक्रिया शुल्क जमा झाल्याबाबतचा SMS आल्यानंतरच उमेदवाराने त्याला मिळालेच्याApplication ID वरुन आपला प्राथमिक अर्ज पुन्हा उघडून अर्जातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखेकडून देण्यात आलेला Transaction ID करवा. त्यानंतर उमेदवाराने सदर अर्जाची प्रिंट काढावी. सदर अर्जाची प्रत व चलन भरल्याची रा. प. महामंडळाची प्रतकागदपत्र छाननीचे वेळी रा.प. महामंडळाकडे जमा करणे बंधनकारक आहे. सदर अर्जाची व  चलनाची मूळ प्रत असल्याशिवाय उमेदवारांची कागदपत्रे छाननी केली जाणार नाहीत.
८. उमेदवाराने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत पैसे भरल्यानंतर त्याची स्थितीwww.mahast.in  या संकेतस्थळावर पाहता येऊ शकेल.
९.  ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहित भरती प्रक्रिया शुल्क भरलेल्या उमेदवाराची स्थितीपरिक्षा प्रवेशपत्र / वेळापत्रक परिक्षा  केंद्र बैठक क्रमांक इत्यादीबाबतची माहिती वर दिलेल्या वेबसाईटवर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच एस.एम.एस. द्वारे सूचित करण्यात येईल. अन्य कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारानची राहील.
१०. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर www.mahast.in या संकेतस्थळावरुन परिक्षेचे प्रवेशपत्र विहीत नमूद कालावधीत डाऊनलोड करुन घ्यावे. कोणत्याही उमेदवारास पोष्टाद्वारे प्रवेशपत्र पाठविले जाणार नाही व प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवारास परिक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही.
११. उमेदवाराच्या मदत व माहितीकरिता संस्थेचा दूरध्वनी क्रमांक 7774060901/02 या प्रमाणे आहे.
१२. उमेदवाराने अर्जासोबत लहान कुटुंबाची माहिती भरणे अनिवार्य राहिल.

Important Links For MSRTC Bharti 2015

No comments:

Contact Us

Name

Email *

Message *

| Copyright © 2013 Recruitment 2015 - MahaCityJobs.com