Maharashtra HSC 2013 Exam Results
महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ५ जूनपूर्वीच जाहीर केला जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज येथे दिली. या वर्षी कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी संप केला होता. त्यामुळे २0 दिवस वाया गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५ जूनपर्यंत निकाल लावणे अपेक्षित असले, तरीही हा निकाल लावणे आव्हानात्मक काम आहे. पेपर तपासणीचे काम सुरू केले, तेव्हा देखील वेळेत निकाल लावणे अशक्य वाटत होते. परंतु निकालाला उशीर होऊ देणार नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच बारावीचे निकाल वेळेवरच जाहीर केले जातील. - राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षणमंत्री
No comments: