AROGYA VIBHAG GROUP-D BHARTI 2016 | FIELD WORKER BHARTI 2016 | POLICE BHARTI 2016 | MAHADISCOM BHARTI 2016
Search Jobs & Results :


यूपीएससीचा पेपर मराठीत

यूपीएससीचा पेपर मराठीत




केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्‍या मुख्य परीक्षेत इंग्रजी व हिंदीचा हट्ट आता सोडला असून त्यांनी नरमाईचे धोरण स्विकारत मराठीसह सर्व प्रमुख भाषांतून पेपर लिहिण्याची परवानगी विद्यार्थ्यांना दिली आहे. लोकसेवा आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर आज त्या संदर्भातील नविन अधिसूचना आज जाहीर केली. 
मराठीसह प्रादेशिक भाषा मुख्य परीक्षेतून विविध अटी व निकष लावून वगळण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेला होता. त्यामुळे त्याला सर्व थरांतून विरोध झाला होता. त्यामुळे हा निर्णय मागे घेऊन बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सुधारित अधिसूचना जाहीर करण्यात आले त्यानुसार मुख्य परीक्षेतील पूर्वीची इंग्रजी भाषेची सक्ती रद्द करण्यात आली आहे. पदवी कोणत्याही विषयात असली तरीही मराठीसह कोणत्याही भाषांमध्ये परीक्षा देण्याची मुभा आता देण्यात आलेली आहे.
एक प्रादेशिक भाषा व इंग्रजी भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहे. मुख्य परीक्षा १७५0 गुणांची राहणार असून त्यात एकूण ७ पेपर असणार आहेत.

किमान पात्रतेचा निकष मात्र युपीएससीने स्वत:कडे राखून ठेवला आहे. कोणताही वैकल्पिक विषय घेण्याचे स्वातंत्र्य युपीएससीने आता दिले आहे. प्रादेशिक भाषा निवडीतील २५ जणांची अटही रद्द करण्यात आली आहे. मुलाखत २७५ गुणांची राहणार असून एकूण परीक्षा २0२५ गुणांची असणार आहे.  

No comments:

Contact Us

Name

Email *

Message *

| Copyright © 2013 Recruitment 2015 - MahaCityJobs.com